तळोदा : शहरातील योगेशभाऊ चौधरी मित्र मंडळाच्यावतीने 407 रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्व़ अजीतदादा पवार व अन्य़ चार दिवंगतांना अनोखी श्रध्दांजली वाहिली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते योगेश प्रभाकर चौधरी व लोकनियुक्त़ नगराध्यक्षा भाग्य़श्री योगेश चौधरी यांनी अजितदादांसह चार दिवंगतांच्या प्रतिमेला पुष्पवाहून रक्तदान शिबीराचा प्रारंभ केला.तसेच दोन मिनिटे स्त़ब्ध़ उभे राहून आदरांजली वाहिली.
जन कल्याण रक्त़ केंद्र नंदुरबार, जिल्हा शासकीय रुग्णालय नंदुरबार व नवजिवन रक्तपेढी धुळे यांचे सहकार्य शिबीराला लाभले. रक्तदान शिबीराच्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे,लाडक्या बहिण योजनेचे अध्यक्ष भरत गावित,राष्ट्रवादीचे सरचिटणिस रतन पाडवी,मालती वळवी,उपजिल्हाध्यक्ष नरेंद्र नगराळे,मोहन शेवाळे आदी मान्य़वर उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी व योगेश चौधरी यांच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतूक केले.
सकाळी आठ वाजेला रक्तदान शिबीराला प्रारंभ झाला.सायंकाळी तब्ब़ल साडे सहा वाजेला शिबीराचा समारोप करण्यात आला. जिल्हाशासकीय रुग्णालय 72, जनकल्याण रक्त़ केंद्र 175 व नवजिवन रक्तपेढी 160 असे 407 रक्त़दात्यांनी रक्त़दान केले.यावेळी उपनगराध्यक्ष,नगरसेवक,ग्रामस्थ़,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




