आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राजकारण

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर ‘महायुती’च, पण अध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच – हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : दोन्ही राष्ट्रवादीमधील पहिले ऐक्य चंदगडमध्ये व नंतर पुणे जिल्ह्यात झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात यापुढेही कायमचे एकत्र राहणार आहोत. भविष्यात चंदगड व गडहिंग्लज मतदारसंघ वेगळे झाले तरी दोन्ही आमदार राष्ट्रवादीचेच असतील. जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल. परंतु, अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. नूल येथे जिल्हा परिषद व […]

राजकारण

सुनेत्रा अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागणार का ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. परंतु, आता सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा […]

राजकारण

भाजप हा बापच, हे लक्षात ठेवा; वैभव पाटील यांचा सुहास बाबर यांना इशारा

विटा : खानापूर मतदारसंघातील शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्री यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे लाजिरवाणी आहे. आमदार बाबर हे आमच्या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत. याचीच आम्हाला लाज वाटते. खरे तर राजकारणात टीका करीत असताना आपल्या कुवतीप्रमाणे व आपल्या बरोबरीच्या लोकांबद्दल बोलणे […]

राजकारण

सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात? सुनील तटकरेंनी सांगितले

मुंबई: अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली नियुक्ती तांत्रिकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. अंजली दमानिया यांनी असा आक्षेप घेतला होता की, […]

राजकारण

निकालानंतर मिरवणूक, साऊंड सिस्टीम, फटाक्यांसह गुलालावर बंदी

कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. मतदारसंघांमध्ये निर्बंध, मतदान केंद्र परिसरात मोबाइल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध, मतमोजणी केंद्र परिसरात कलम १६३ लागू यासह निकालानंतर मिरवणूक, रॅली, मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम, फटाके व गुलालावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान व […]

राजकारण

“मुंबईत भाजपाचा महापौर होणे हा मुंबईसाठी सुवर्ण क्षण”; भाजपाचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबईत भाजपाचामहापौर बनणे हा मुंबईसाठी, १०६ हुतात्म्यांसाठी आणि मराठी मनासाठी काळा दिवस असेल. मुंबईचे अस्तित्व, मुंबईची अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपाने केली आहे. भविष्यात ही मुंबई उद्योगपतींच्या हातात दिली जाईल. भाजपाची भूमिका ही कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात […]

गुन्हेगारी

क्रिकेटच्या वादातून ठाण्यात तरुणाचा खून

ठाण्यातील खारटन रोड भागात राहणारा एक १३ वर्षीय मुलगा बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गावदेवी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना तिथे हरीश नावाच्या मुलाचा रोहित पटनेशा (२४) आणि विष्णू चव्हाण (२४) यांच्याशी वाद झाला. या वादातून पटनेशा आणि चव्हाण यांनी हरीशला मारहाण करण्यास सुरुवात केली. शाब्दिक चकमक आणि रक्तरंजित शेवट या मारहाणीची माहिती […]

गुन्हेगारी

आयकर अधिकारी पित्याची हत्या करणाऱ्या मुलाला पोलीस कोठडी

लातूर : ‘आईच्या औषधाेपचारासाठी पैसे का देत नाही? आमचा सांभाळ का करत नाही?’ असा जाब विचारत पोटच्या २९ वर्षीय मुलाने आयकर विभागात अधिकारी असलेल्या जन्मदात्याचा गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. ही घटना खोपेगाव (ता. लातूर) येथे मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, पाेलिसांनी अटक केलेल्या आराेपी मुलाला बुधवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची […]

गुन्हेगारी

मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार

मुंबईतील कफ परेड परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय दिव्यांग तरुणीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ऐकू किंवा बोलू शकत नाही. अशा परिस्थितीत, गेल्या काही महिन्यांपासून नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत होत. अखेर डीएनए तपासणीत गर्भातील भ्रूणाचा जैविक संबंध वडिलांशी जुळल्यानंतर आरोपी […]

गुन्हेगारी

मच्छिंद्रनाथ गडावर भाविकांचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ (मायंबा) गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अंभोरा पोलीस आणि बीड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत अंभोरा पोलिसांनी उघड केलेली ही दुसरी मोठी टोळी असून, यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशी होती चोरीची पद्धत, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी […]