तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, मंगरुळपीरचे […]
महाराष्ट्र
१२ हजार शिक्षक आपापल्या जिल्ह्यात परतणार; आंतरजिल्हा बदलीसाठी हालचाली सुरू
गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास विभागाने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे जवळपास १२ हजार शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यात बदलीने जाता येणार आहे. आता ग्रामविकास विभाग सक्रिय झाला आहे. विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत प्रधान सचिवांनी ६ […]
पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला
खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या यवतमाळमधील तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमधील तरुणासोबत लग्न जुळले. बोलणी झाली. हुंड्याची रक्कमही ठरली. त्यानंतर यवतमाळात त्या दोघांचा साखरपुडा सोहळा झाला. लग्नाच्या तयारीला वेग आला. त्यात मुलीच्या घरी पूजा ठेवण्यात आली होती, त्या पूजेसाठी तो यवतमाळला आला. त्यावेळी घरी कोणी नसताना तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर एकदा प्रवासातही बलात्कार केला. हे सगळं घडल्यानंतर […]
गोसेखुर्द बॅक वॉटरमुळे प्रभावित ४२ गावे प्रकल्पबाधित की पूरबाधित ?
एकीकडे इंदिरा सागर प्रकल्प (गोसे प्रकल्प) एकदाचा १०० टक्के भरल्याचा आनंद जलसंधारण विभागात साजरा होत असला तरी, दुसरीकडे मात्र या प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांची झोप उडाली आहे. जी गावे आणि शेती या प्रकल्पाच्या थेट पाण्याखाली आलीत, अशा १८९ गावांना प्रकल्पबाधित ठरवून पुनर्वसनही झाले आहे. तर ४२ गावांना बैंक वॉटरचा फटका बसत असताना ही […]
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणीच पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
बुलढाण्यातली हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले; मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे कंत्राट ‘सॅम […]
नागपुरात १६ वर्षांच्या मुलाकडून दोन चिमुकल्यांवर अनैसर्गिक अत्याचार
नागपूर : रील्स आणि विविध सोशल माध्यमांतून लहान मुलांवर नको त्या गोष्टींचा प्रचंड भडीमार होत आहे. त्यातूनच अनेकदा लैंगिक विकृती बळावतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरातून समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्याहून लहान असलेल्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी मुलगा […]
अजित दादांच्या ‘ऑन स्पॉट’ निर्णयाने ‘एचएमटी’ तांदूळ जनकाला मिळाली होती पाच एकर जमीन
एचएमटी धानाचे जनक कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांची २०१० मध्ये जागतिक स्तरावर ‘फोर्ब्स’ने दखल घेतली. मात्र, त्यांच्याकडे हक्काची जमीन नव्हती. दादाजींची संशोधन कीर्ती ऐकून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट नांदेड गाठले. ऑन स्पॉट निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खोब्रागडेंना पाच एकर जमीन व रोख पाच लाख दिले. अजित दादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकताच जिल्हाभरातील अनेकांना चटका […]
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी टीप दिली; मुरकूटडोह जंगलातून मोठा शस्त्रसाठा हस्तगत
गोंदिया : महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोनमधील बेस कॅम्प मुरकूटडोह भागातील टाकेझरी-बेवारटोला डॅम जंगल परिसरातून नक्षलवाद्यांनी लपविलेला शस्त्रसाठा व स्फोटके गोंदिया पोलिसांनी हस्तगत केली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राबविलेल्या अभियानात एके-४७, एसएलआरसह अनेक शस्त्रे व स्फोटक साहित्य सापडल्याची माहिती शुक्रवारी (दि. ३०) गोंदिया पोलिस दलाने दिली. महाराष्ट्र शासनाने २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली […]
ट्रकच्या धडकेत वडिलांचा जागीच अंत, मुलगा गंभीर; आरमोरी येथील घटना
आरमोरी तालुक्यातील आकापूर येथून नातेवाईकांकडे भेट देऊन परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली. किटाळी चौकात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले. तुळशीदास रामाजी सहारे (५४, रा. देऊळगाव ता. आरमोरी) असे मृताचे नाव […]
अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात अजित पवारांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन
मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात श्रीगुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबई स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना […]










