अकोला

बोरगाव मंजूजवळ कार अपघातात दोघांचा मृत्यू, राष्ट्रीय महामार्गावरील घटना

बोरगाव मंजू (जि. अकोला): राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नवीन बायपास वाय-पॉईंटजवळ धावत्या कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला व एक पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात खुशरंग भिलुजी मायवाड (वय ५०) व अनिता खुशरंग मायवाड […]

हिंगोली

वसमतमध्ये बँकेच्या मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीची पोलिसांनी काढली भररस्त्यातून ‘वरात’

काही दिवसांपूर्वी वसमत येथील कोर्टा पाटी परिसरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकाला लुटून पसार होणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. तपास प्रक्रियेसाठी या आरोपींना मंगळवारी (१३ जानेवारी) वसमत शहरात आणले असता, पोलिसांनी त्यांची शहरातून ‘वरात’ काढली. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वसमत शहरातून आंबा […]

लातूर

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विमान धावपट्टीवरून दोनदा परतले! लातुरातून उड्डाण रद्द

लातूर : जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर आलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर विमानतळावरून बुधवारी होणारे उड्डाण अचानक रद्द झाले. विमान दोनवेळा धावपट्टीवरून परत आल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. पाणीपुरवठा मंत्री पाटील हे दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी विमानाने लातूरला आले होते. जिल्ह्यातील प्रचार सभा आटोपून त्यांची परतीची वेळ दुपारी ४.३० […]

बीड

बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश

आरोग्य विभागातील भरती घोटाळ्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आरोग्यसेवक (क) या पदाचे बोगस नियुक्ती आदेश देऊन बेरोजगारांची १५ ते १७ लाख रुपयांना फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बोगस आदेशांवर चक्क उपसंचालकांच्या पत्रावर धाराशिवच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी स्कॅन करून लावण्यात आली आहे. हेच आदेश […]

परभणी

‘मंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

राज्यभर गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस विभाग आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सरकारची न्यायालयाचे आदेश पाळण्याची इच्छाच दिसत नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल […]

नांदेड

७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

तालुक्यातील दाभड येथे ७५ वर्षीय पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या होऊन आठवडा उलटला, तरी आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज, बुधवारी दाभड येथील शेकडो ग्रामस्थांनी अर्धापूर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनावर धडक मोर्चा काढला. “आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला […]

धाराशिव (उस्मानाबाद)

विलिनीकरणाचे ठाऊक नाही मात्र, निवडणुकीत मनोमिलनाची पुष्टी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु होती, ती अंतिम टप्प्यात आली होती, असे दावे केले जाऊ लागले आहेत. या दाव्यांतील तथ्ये ती करणाऱ्यांनाच ठाऊक असली तरी, एक मात्र खरे. निवडणुकीपूर्वीच मनोमिलन झाल्याचे लढतींवरून स्पष्ट होत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी मिळून २८ जागांवर रिंगणात आहेत. यातील एकाही जागेवर ते […]

जालना

मराठवाड्याचा रेल्वे विकास फास्ट ट्रॅकवर; तीन मार्गांसाठी १४ हजार कोटींचा निधी मंजूर: रावसाहेब दानवे

जालना : मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असलेल्या अहमदनगर- बीड-परळी, जालना- जळगाव आणि नांदेड- वर्धा या रेल्वे मार्गांसाठी तब्बल १४ हजार कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगर शहराला सीईआर प्रोग्राम अंतर्गत निधी मिळणार असल्याची माहिती माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालना शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

जिल्हा परिषद निवडणूक: मतदारांच्या रांगा वगळून इतर ठिकाणी जमावबंदीचे आदेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक होण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकारी, कर्मचारी व मतदान करण्यासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळून जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. […]

सोलापूर

विचारल्यावर भाजपला…; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “अजित पवार ही राज्याची संपत्ती होती, पण त्यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा घातपात होता का?” असा खळबळजनक संशय त्यांनी सोलापूरच्या प्रचारसभेत व्यक्त केला. सुषमा अंधारे यांनी अजित पवार वापरत असलेल्या विमानाबाबत तांत्रिक […]