
धडगाव : आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, धडगाव संचलित कै. एस. व्ही. ठकार माध्यमिक व नारायण खेडकर उच्च माध्यमिक विद्यालय, धडगाव येथे केंद्र क्रमांक (0646) या परीक्षा केंद्राची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. या केंद्रावर S068804 पासून S165253 पर्यंत बैठक व्यवस्था असून 10 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
10 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्रजी विषयाच्या पेपराला एकूण 627 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 25 वर्ग खोल्यांमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षा ही वर्ग खोल्यातील सीसीटीव्ही च्या निगराणी खाली होणार असून परीक्षा कॉपीमुक्त व तणामुक्त पार पाडण्यासाठी पालक सभा घेण्यात आली. विद्यार्थ्याना मंडळाची सूची वाचून दाखविण्यात आली. शिक्षक, विदयार्थी व पालकांनी सूचनांचे पालन करून परीक्षा सुरळीत व शांत वातावरणात पार पाडावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हेमंत बी. वळवी प्राचार्य श्रीमती यु. के. पाडवी व केंद्र संचालक श्री एस के मिरघे यांनी केले आहे.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




