आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सांगली

मतदानासाठी प्रशासन सज्ज झोनल अधिकाऱ्यांसह किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी १८ लाख १८ हजार ७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी दोन हजार ३९ मतदान केंद्रे असून, या ठिकाणी २४८ झोनल अधिकारी आणि आठ हजार ९७९ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असून, ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ […]

पुणे

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्याने उत्पादनात घट नाही

उसाचे उत्पादन हे उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपीकता, सिंचन व्यवस्था व हवामान परिस्थिती यावर अवलंबून असते. कापणीची पद्धत ही जैविक उत्पादनावर कोणताही परिणाम करत नाही. कापणी ही केवळ आधीच तयार झालेल्या उसाची तोडण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रतिएकरी सुमारे १५ टन ऊस उत्पादनात घट होते, हे वास्तवाला धरून नाही. हार्वेस्टरमुळे […]

नाशिक

पेपर मिल कंपनीतील माल जळून खाक

नाशिक – सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील एमआयडीसीत धनश्री पेपर रोल कंपनीत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील रद्दी पेपर आणि इतर कच्चा माल जळून खाक झाला. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कच्चा माल ठेवला होता त्यामुळे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. कागदांमुळे आग पसरत गेली. या आगीतील धुराचे लोळ २ […]

कोल्हापूर

कांद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

किणी – पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलाजवळ कांद्याची वाहतूक करणार ट्रक पहाटेच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलावर कोल्हापूरच्या दिशेने कांदा घेऊन येणार ट्रक रस्त्याच्या मध्यभागीच उलटुन […]

अहिल्यानगर (अहमदनगर)

पोलीस आले आणि दार तोडून आत गेले तेव्हा विशाल

शिर्डी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडल्याने एकच खळबळ उडाली असून, या घटनेनंतर काही काळ हॉटेल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय २२) असे असून, तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. रोजगारासाठी तो शिर्डीत आला होता व सध्या राहाता […]

नंदुरबार

अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील एका धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम […]

नंदुरबार

२९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे

जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी १०४१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणूक निकालानुसार अभिजीत पाटील यांना एकूण १८,७९८ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मकरंद पाटील यांना १७,७५८ मते प्राप्त झाली. मतमोजणीदरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली, मात्र अखेरीस जनता विकास आघाडीने बाजी मारली. […]

धुळे

मात्र पक्षांतर करणाऱ्या १४ नेत्यांना जनतेने नाकारले

धुळे – महापालिका निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याची मोठी कसोटी लागली होती. निवडणुकीच्या तोंडावर ‘सोयीचे राजकारण’ करत तंबूत शिरलेल्या उमेदवारांना मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. यात पक्ष बदलून नशीब आजमावणाऱ्या ९ उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरी १४ जणांना मात्र पराभवाची नामुष्की सोसावी लागली आहे. शहरातील १९ प्रभागातील ७० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपामध्ये ५५० […]

धुळे

“राजवर्धन, छोट्या विमानाने प्रवास करत जाऊ नकोस…”, दादांनी सहकाऱ्याला केलं होतं सावध, पण…

“राजवर्धन, छोट्या विमानाने प्रवास करत जाऊ नकोस…” हे शब्द होते दिवंगत अजित पवार यांचे. आपल्या सहकाऱ्याची मोठ्या भावासारखी काळजी करणाऱ्या दादांच्या या सल्ल्याची आठवण सांगताना माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार धुळ्यात आल्यावर हक्काने कदमबांडे यांच्याकडे जेवायला थांबत असत. एका जेवणाच्या पंगतीवर गप्पा मारताना दादांनी राजवर्धन यांना सुरक्षेच्या कारणास्तव छोट्या विमानाने […]

जळगाव

शिकवणीला जाणाऱ्या २ मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकललं

जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून एक अत्यंत संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर साकरी गावातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले होते. साकरी येथील दोन अल्पवयीन मुली […]